S M L

नियोजनशून्य कारभार आणि गाफील सरकार - अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2016 07:49 PM IST

ajit_pawar--621x414

बीड - 06 मे :  नियोजनशून्य कारभार आणि गाफील सरकार, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडयाच्या दौर्‍यावर असलेल्या अजित पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाण्याच्या संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि सरकारच्या मंत्र्यांनंतर आता राष्ट्रवादीचे अजित पवारही मराठवाड्याच्या दुष्काळदौर्‍यावर गेले आहेत. बीड जिल्ह्यापासून त्यांनी आपल्या दौर्‍याची सुरूवात केली आहे. या दौर्‍यादरम्यान त्यांनी जलसंधारणाच्या कामांचीही पाहणी करणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही त्यांच्यासोबत या दौर्‍यात सहभागी झाले आहेत. आज बीडमध्येच राष्ट्रवादीने जाहीरसभेचं आयोजन केलंय. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पावसाळ्यातच नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. राज्यातील धरणांमध्ये पाणी असूनही सरकार जनतेला पाणी देत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारला जाग आलेली नाही. गेल्या 25 वर्षात असा दुष्काळ पाहिला नसल्याचं सांगत आमच्यावर किती दिवस जबाबदारी ढकलणार, असा सवाल विचारत त्यांनी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका, असा इशाराही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close