S M L

सामंजस्य आणि सुसंवादाची गरज

26 मार्चमराठी आणि भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय असणारे सांस्कृतिक सामंजस्य आणि समन्वय सध्याच्या काळात प्रस्थापित होणे गरजेचे आहे, अशी गरज आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून व्यक्त केली. दभिंच्या या अध्यक्षीय भाषणाला भाषिक तसेच प्रांतवादाचा संदर्भ होता. सुमारे 400 वर्षांच्या परकीय आक्रमणातही मराठी भाषा नष्ट झाली नाही. आणि सध्या सुरू असलेल्या एलपीजीच्या अर्थात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या आघाताने मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तर साहित्यिक वादाच्या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पावित्र्य विडंबन या संकल्पनांतील भेद समजून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.अध्यात्म आणि विज्ञानाच्या संयोगाने उद्याचे साहित्य उत्क्रांत होईल. त्यासाठी संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव आणि आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाची मदत होईल, असेही ते म्हणाले. याचवेळी भाषाशुद्धीसोबतच भाषा समृद्धीकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.सध्याचे साहित्यिक प्रज्ञाबळ आणि प्रतिभाबळ विसरले आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. राजकीय आणि भौगोलिक कारणांसाठी राज्याच्या सीमा बदलत असतात. त्यावरून वाद उभा करण्याऐवजी सांस्कृतिक सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2010 10:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2010 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close