S M L

अनैतिक संबंधाच्या आड येते म्हणून डॉक्टराने केली पत्नीची हत्या

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 04:55 PM IST

अनैतिक संबंधाच्या आड येते म्हणून डॉक्टराने केली पत्नीची हत्या

सोलापूर - 07 मे : अनैतिक संबंधाच्या आड येते म्हणून एका डॉक्टराने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमध्ये घडलीये.डॉ प्रसन्न अग्रहार असं या डॉक्टरांचं नाव आहे. पत्नीचा खून केल्याप्रकरणी डॉ. प्रसन्न यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, सध्या तो फरार आहे.

डॉ.प्रसन्न अग्रहार हा न्युरो सर्जन म्हणून गंगामैय्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. तसंच त्याची मृत पत्नी डॉ.रश्मी यादेखील एम.डी.होत्या. मात्र त्या गृहिणीची भूमिका पार पाडत होत्या. डॉ. प्रसन्न याला वाईल्ड फोटोग्राफीची आवड होती. त्याचबरोबर त्याची प्रेयसी मेघरॉय चौधरी हिलादेखील तीच आवड होती. राजस्थानातील जयपूरमध्ये भरलेल्या एका एक्झिबिशनमध्ये दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेम संबंधाला सुरुवात झाली. मेघरॉय चौधरी मुलाच्या कोलकत्त्याच्या असून पेशाने शिक्षिका आहे. हे प्रकरण डॉ. रश्मी यांना समजल्यानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर मात्र पत्नीचा त्रास होऊ लागल्याने डॉ. प्रसन्न याने तिचा खून केला.

हा खून 9 जुलै 2015 रोजी करण्यात होता. खून केल्यानंतर मात्र रश्मी यांना गंगामैय्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथं डॉ. एस. प्रभाकर, डॉ अमित कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब गायकवाड यांनी संगनमताने तिचे शवविच्छेदन न करता स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र एका अज्ञात व्यक्तीच्या तक्रारी अर्जानंतर पोलिसांनी या तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकारसमोर आला. या प्रकरणी डॉ प्रसन्न आणि मेघरॉय चौधरी यांच्यावर खून केल्याचा तर उर्वरीत तीन डॉक्टरांवर गुन्हाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धक्कादायक बाब म्हणजे डॉ प्रसन्न याने पत्नीची लाइफ़ इन्शुरन्स पॉलिसीचे 21 लाख रुपयेही लाटल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान, डॉ प्रसन्न याने सेशन कोर्टासह हायकोर्टात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही कोर्टाने त्याचा अर्ज फ़ेटळलाय. त्यामुळे त्याची अटक अटळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close