S M L

गारपिटीमुळे 5 हजार कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 05:37 PM IST

गारपिटीमुळे 5 हजार कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

धुळे -07 मे : जिल्ह्याला सतत दुसर्‍या दिवशी वळव्याच्या पावसाचा फटका बसलाय. जिल्ह्यातील बुरजड या गावात प्रशांत पाटील या तरूण शेतकर्‍याच्या पाच हजार कोबड्यांची पिल्लं वळव्याच्या पावसाचे बळी ठरले.

वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने आणि गारपिटीने या पिल्लांचा जीव घेतला असून, पाटील या अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे पूर्णपणे कोलमडून पडले आहे. पाटील यांच्या शेडमध्ये मेलेल्या कोमड्यांच्या पिल्लांचा खच पडलाय. त्यातच योग्य पंचनामा झाला नाहीये. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यालाही या पाऊसाचा फटका बसालाय. शेतात आणि चाळीत ठेवलेला कांदा या पाऊसामुळे भिजून गेलाय. जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे आणि पिंपळनेर भागात या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून या भागात अनेक घरांची छतं उडालीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close