S M L

केबीसी घोटाळा प्रकरणी चव्हाण दाम्पत्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 09:55 PM IST

07 मे : नाशिकच्या केबीसी कंपनी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाणला नाशिक पोलिसांनी अखेर मुबई विमानतळावरून अटक केलीये. अल्पावधीत तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आज चव्हाण दाम्पत्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.WhatsApp-Image-20160506 (1)

पैशाच्या हव्यासापोटी एका खाजगी कंपनीमधून बाहेर पडलेल्या भाऊसाहेब चव्हाणनं 2012 साली स्वतःची केबीसी नावाची कंपनी स्थापन केली. त्यात पैसे गुंतवा आणि तिप्पट परतावा मिळवला, असं आमिष त्यांनं ग्राहकांना दाखवलं. त्यातून त्यानं कोट्यवधींची माया जमवली आणि कुणाचेही पैसे परत न करता तो आपल्या बायकोसह देशातून पळून गेला. फक्त नाशिक जिल्ह्यात 8500 गुंतवणूकदारांनी तब्बल 210 कोटी रुपये त्याच्याकडे गुंतवले आहेत. काल हाच भाऊसाहेब चव्हाण नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

नाशिक जिल्ह्यातल्या एकट्या वडनेर भैरव या गावात आल्यावर कळालं की, एका एजंटामार्फत गावातल्या जवळपास पाचशे लोकांनी तब्बल 70 कोटी रुपये केबीसीमध्ये गुंतवले आहेत. याच वडनेर भैरव गावातल्या 90 टक्के लोकांनी केबीसीमध्ये गुंतवणूक केली आहे. कमी पैसे गुंतवणूक मोठा परतावा मिळेल या आशेपोटी लोकांनी यात पैसे गुंतवले आणि त्याचा त्यांना फटका सहन करावा लागला.

हा केबीसी घोटाळा तब्बल 350 कोटींपेक्षा जास्त रुपयाचा आहे. जलदगती कोर्टात हा खटला चालवून फसलेल्या ग्राहकांना न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close