S M L

मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती गिरणी कामगारांच्या घरांची सोडत

Samruddha Bhambure | Updated On: May 9, 2016 12:39 PM IST

मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती गिरणी कामगारांच्या घरांची सोडत

मुंबई – 09 मे : मुंबईतल्या गिरणी कामगारांना आज हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईतल्या सहा गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 2 हजार 634 घरांसाठी सोडतीस सुरवात झाली आहे. मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती गिरणी कामगारांच्या घरांची सोडत निघाली. दरम्यान, यापुढेही गिरणी कामगारांना घर देणार, जागांचे अधिकाधिक पर्याय सरकार उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सुमारे 18 हजारांहून अधिक कामगार नशीब आजमावणार आहेत.

वंद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात येत आहे. या सोडतीसाठी कामगार संघटनांना चार वर्षे संघर्ष करावा लागला. गिरणी कामगारांच्या सहा हजारांहून अधिक घरांची पहिली सोडत जून 2012 मध्ये काढण्यात आली होती. आजची सोडत भारत, सेंच्युरी, वेस्टर्न इंडिया मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल, स्वान मिल-ज्युबिली आदी गिरण्यांच्या जागेवरील घरांसाठी काढण्यात येत आहे. या जागांवर 2,634 घरांचे बांधकाम सुरू आहे. घरांच्या किमती ठरवण्यावरून कामगार संघटना आणि राज्य सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या; पण तोडगा निघत नव्हता. अखेर घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2016 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close