S M L

तुमचं एटीएम कार्ड सुरक्षित तर आहे ना ?, नाशिकमध्ये 'एटीएम क्लोनिंग'करुन 6 लाख लुटले

Sachin Salve | Updated On: May 9, 2016 07:27 PM IST

तुमचं एटीएम कार्ड सुरक्षित तर आहे ना ?, नाशिकमध्ये 'एटीएम क्लोनिंग'करुन 6 लाख लुटले

नाशिक - 09 मे : चोर पाकिट मारू नये म्हणून एटीएम कार्ड वापरण्याचा सोप पर्याय सर्वच जण वापरतात आणि ते तितकं सोपही आहे. पण, आता गाफील राहू नका, कारण चोरट्यांनी आता एटीएम कार्डवरच वक्रदृष्टी टाकली आहे. नाशिकमधील नोकरदारांचे जवळपास 6 लाखांहून अधिक रक्कमा पनवेल येथील मशीन मधून परस्पर काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकमधील यशवंत व्यायामशाळेसमोरील हॉटेल जगन्नाथ शेजारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील अनेक खातेदारांचे पासवर्ड आणि सिक्युरिटी सिस्टीमसह एटीएमचा संपूर्ण डाटा चोरल्याचं समोर आलं आहे. या माहितीच्या आधारे या चोरट्यांनी संगणकाच्या मदतीने पनवेल येथील एटीएममधून जवळपास तीन लाख रुपयांहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली आहे.

या खातेदारांना त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे मोबाईलवर संदेश प्राप्त झाले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे समजलं. या तक्रारदारांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. हा एटीएम क्लोनिंग चा प्रकार असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक एटीएम मशीन रामभरोसे आहे. सुरक्षा रक्षक नसणे,सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे,या गोष्टी मुळेच चोरांना चोरी करण्यासाठी मोकळे रान मिळत असल्याचं दिसून येतेय. हे प्रकार मुंबईतही घडतं असल्याचं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2016 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close