S M L

संदीप सावंत मारहाण प्रकरणी निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Sachin Salve | Updated On: May 10, 2016 04:30 PM IST

nilesh rane newsरत्नागिरी -09 मे: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे नेते निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड सत्र न्यायालयाने नाकारला आहे.

या प्रकरणातील 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून 4 आरोपींचा जामीन नाकारला आहे. यात निलेश राणेंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

निलेश राणेंना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खेड सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निलेश राणे उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंना अटक होते की नाही याबद्दलचा सस्पेन्स काय आहे.

संदीप सावंत यांनी निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी निलेश राणेंविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2016 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close