S M L

यावर्षी चांगला पाऊस, भेंडवळच्या घटमांडणीतून बळीराजाला दिलासा

Sachin Salve | Updated On: May 10, 2016 06:47 PM IST

यावर्षी चांगला पाऊस, भेंडवळच्या घटमांडणीतून बळीराजाला दिलासा

बुलडाणा - 10 मे : हवामान खात्यापाठोपाठ आता यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीमध्ये व्यक्त करण्यात आलाय. पहिल्या महिन्यात साधारण स्वरूपाचा, दुसर्‍या आणि तिसर्‍या महिन्यात अतिवृष्टी तर चवथ्या महिन्यात पावलाचा वेग मंदावेल असा अंदाज घटमांडणीमध्ये व्यक्त करण्यात आलाय. बुलडाण्यात भेंडवळ या पारंपरिक पद्धतीनं अंदाज व्यक्त करण्यात येतो.

भेंडवळ घडमांडणी पद्धतीला तिनशे वर्षांची परंपरा आहे. गावाजवळच्या शेतात मोठे रिंगण करून खड्डा तयार करून त्यात घटमांडणी करण्यात येते. पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळं ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मातीची घागर ठेवण्यात येते. या घागरीवर काही खाद्यपदार्थ, धान्य कडधान्य ठेवली जातात. दुसर्‍या दिवशी म्हणजे त्यातल्या बदलांचे निरीक्षण करून भाकित वर्तवलं जातं. या घटमांडणीवर शेतकर्‍यांचा विशेष विश्वास असतो. या भाकितानंतर शेतकरी पेरणीचे नियोजन करतात.

कशी होते घटमांडणी ?

पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांच्या नावाचा जयजयकार करीत गावाकडील पूर्वेच्या शेतात येतात. त्या ठिकाणी मोठे रिंगण करून खड्डा तयार करून या खड्डय़ात घटमांडणी करण्यात येते. पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मातीचा करवा (घागर) ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, सांडोळी, कुरडई, भजा, वडा, करंजी हे खाद्यपदार्थ ठेवण्यात येतील. हे पदार्थ वेगवेगळ्या घटकांचे प्रतीक मानले जातात. खड्डय़ात विड्याचे पान आणि त्यावर सुपारी म्हणजेच देशाच्या राजाची गादी अशी प्रतीकात्मक मांडणी राहते. त्याचबरोबर घटामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी 18 धान्यांची गोलाकार मांडणी केली जाते. दुसर्‍या दिवशी म्हणजे सकाळी 6 वाजता रात्रीतून घटामध्ये जे बदल होतील, त्याचे निरीक्षण करून महाराज शेतकर्‍यांना यंदाच्या पीकपरिस्थिती आणि इतर घटनांचे भविष्य कथन करतात. या भाकितानंतर शेतकरी पेरणीचे नियोजन करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2016 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close