S M L

दुष्काळाचं दाहक वास्तव, राज्यात 30 हजार गावांमध्ये दुष्काळ

Sachin Salve | Updated On: May 11, 2016 10:26 AM IST

maharashtra drought_32211 मे : राज्यातल्या तब्बल 30 हजार गावांमध्ये दुष्काळ आहे आणि तब्बल 10 हजार गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

राज्यातल्या 33 जिल्ह्यांमधल्या 44 हजार गावांपैकी तब्बल 29 हजार 600 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. राज्य सरकार आता या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थितीऐवजी दुष्काळ जाहीर करणार आहे. पाऊस येईपर्यंत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याचा आणखी आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आणखी 900 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2016 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close