S M L

मुख्यमंत्र्यांना गायीची धार काढता येते का? -धनंजय मुंडे

Sachin Salve | Updated On: May 11, 2016 12:05 PM IST

मुख्यमंत्र्यांना गायीची धार काढता येते का? -धनंजय मुंडे

सांगली - 11 मे : मी शेतकरी आहे असे म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना गायीची धार काढता येते का ? असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय. ते सांगलीमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीच्या वतीने सांगलीतील जतमध्ये दुष्काळावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. मी शेतकरी आहे असे म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर एक गाय घेऊन जाऊ आणि त्यांना धार काढायला लावू...जर त्यांना खाली बसून गाईची धार काढता आली नाही तर गाईला टेबलावर चढवूया आणि ते गायीचं दूध काढतात का ? आणि ते शेतकरी आहेत का ? हे बघू, असं मुंडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2016 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close