S M L

भाऊसाहेबच्या लॉकरमध्ये दोन कोटींची सोन्याची नाणी

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2016 09:48 PM IST

WhatsApp-Image-20160506 (1)

नाशिक – 11 मे: केबीसी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण याच्या बँकेतील चौथा लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आज तपासणीदरम्यान उघडलं आहे. त्याच्या लॉकरमध्ये 65 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने सापडले आहेत. याआधीही भाऊसाहेब चव्हाणचे तीन लॉकर उघडण्यात आले होते. त्यामध्येही कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले होते. पोलीस आता भाऊसाहेब चव्हाणची कसून चौकशी करत आहेत. भाऊसाहेब चव्हाणकडून आणखी काही लपवलेले सोन्याचे दागिने आणि रक्कम मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा 'केबीसी'चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर अटक करण्यात यश आलं. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरून अटकही करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून 2 कोटी किंमत असलेलं 2 किलो 600 ग्रॅम सोन्याची नाणी आढळली. केबीसी कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमिष दाखवून अनेकांना ठकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014ला राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या. त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2016 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close