S M L

खूशखबर, यंदा महाराष्ट्रात 27 टक्के जास्त पाऊस !

Sachin Salve | Updated On: May 13, 2016 09:54 AM IST

monsoon_rain

13 मे : दुष्काळाने होरपळणार्‍या राज्यातील जनतेसाठी खूशखबर...महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा 27 टक्के जादा पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. एकट्या कोकणात 27.20 टक्के जास्तीच्या पावसाचा अंदाज आहे. हेच नाहीतर जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात मुसळधार पावसाचे भाकितही हवामान खात्याने वर्तवले आहे.

मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशमध्ये सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक शहर कोरडीठाक पडली आहे. मराठवाड्यातील परिस्थिती भीषण असून लातूर, उस्मानाबाद, बीडमध्ये पाणीबाणी लागू झाली आहे. पाणीचं नसल्यामुळे शेतकरीही हवालदील झाले आहे. मात्र, यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडले अशी शक्यता भारतीय हवामान खाते, स्कॉयमेटने वर्तवली आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने बळीराजा दिलासा दिलाय. राज्यात यंदा 27 टक्के अधिक पाऊस पडणार आहे. पावसाचा पट्टा असलेल्या कोकणात 27.20 टक्के जास्तीच्या पावसाचा अंदाज आहे. एवढंच नाहीतर जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज जर खरा ठरला तर हे वर्ष बळीराजाचे ठरेल यात शंका नाही. पावसाच्या या अंदाजामुळे राज्य सरकारने कंबर कसण्यास सुरुवात केलीये. पावसाळ्यात ेआपत्कालीन परिस्थितीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी ठाण्यात एक उच्चस्तरीय बैठक झाली. सर्व संबंधित विभागांना जय्यत तयारीच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसंच 30 मेपासूनच राज्यात पावसाच्या सरी कोसळतील असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2016 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close