S M L

नागपूरमध्ये शेअर्सचे सट्टेबाजी करणार्‍यांवर छापे, 10 व्यापार्‍यांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: May 13, 2016 10:52 PM IST

नागपूरमध्ये शेअर्सचे सट्टेबाजी करणार्‍यांवर छापे, 10 व्यापार्‍यांना अटक

13 मे :   नागपूरमध्ये पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं सट्टेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांवर छापे टाकले आहेत. हे व्यापारी शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या आडून कोट्यवधींची सट्टेबाजी करत असल्याचा आरोप आहे. त्यांनी गेल्या महिन्याभरात 2,500 कोटींचे अवैध व्यवहार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सेबीच्या मदतीनं नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या कारवाईदरम्यान 10 व्यापार्‍यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी किशोर लद्धड आणि वीणा सारडा अशी प्रमुख आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यांत एल सेव्हन या कंपनीचा रवी अग्रवाल हा प्रमुख हस्तक आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

काय आहे डब्बा ट्रेडिंग?

- खोटं सॉफ्टवेअर बनवून बनावट शेअर्सची उलाढाल

- सर्व व्यवहार रोख आणि हवालाच्या माध्यमातून

- शेअर्सवरचा टॅक्स बुडवला जातो

- गेल्या महिनाभरात नागपुरात 2500 कोटींची उलाढाल

- नागपुरात या घोटाळ्याची पाळंमुळं

- देशभरात या घोटाळ्याची व्याप्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2016 08:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close