S M L

राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपकडून 'नीट' परीक्षेचे राजकारण - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2016 02:54 PM IST

Raj thackray

13 मे :   स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपकडून 'नीट' परीक्षेचे राजकारण करण्यात येत आहे. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजप विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

'नीट'संदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपले गार्‍हाणे मांडले. याबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी देशात मोगलाई सुरू आहे का असा सवाल विचारत भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण साधत असल्याचा आरोप केला. कोर्टाने 'नीट'ची परीक्षा घेण्याचे आदेश दिले असले तरी सध्या बाजारात 'नीट'च्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. याशिवाय, विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून सीईटीची तयारी करत होते. आता कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अवघड परिस्थिती ओढावली आहे. मात्र, भाजपमधील नेत्यांची वैद्यकीय महाविद्यालये नसल्याने त्यांना या सगळ्याशी काही घेणेदेण नाही. राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालये काँग्रेस नेत्यांची आहेत. त्यामुळे 'नीट'च्या माध्यमातून भाजप काँग्रेसबरोबरचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न करत आहे, असं राज यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2016 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close