S M L

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट अनिर्णित अवस्थेकडे

13 सप्टेंबर, बंगलोर - भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेली पहिली टेस्ट अनिर्णित राहण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलियानं 263 रन्सची आघाडी घेतली असली तरी दुसर्‍या इनिंगमध्ये त्यांची टॉप ऑर्डर झटपट कोसळली. टेस्टचा आजचा शेवटचा दिवस शिल्लक असून भारतीय बॉलर्सच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.भारताच्या शेवटच्या बॅट्समनचं काम होतं विकेट न पडू देता ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा दम काढायचा. झहीर खाननं हे काम चोख बजावलं. झहीरनं दिवसाच्या सुरवातीलाच आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट करियरमधली त्याची ही दुसरी हाफ सेंच्युरी. कुंबळे फार काही करू शकला नाही. वॉटसननं त्याला एलबीडब्ल्यू केलं. मग क्लार्कनं इशांत शर्माची विकेट घेत भारताचा डाव संपवला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 70 रन्सची आघाडी घेतली.कुंबळेला खांद्याची दुखापत झाल्यामुळे धोणी विकेट किपिंगसोबतच कॅप्टनची भूमिका बजावत होता. झहीर खानचा बटिंगमधला आत्मविश्वास दुसर्‍या इनिंगमध्ये त्याच्या बॉलिंगमध्येही दिसला आणि दुसर्‍या इनिंगच्या सुरवातीलाच त्यानं हेडनला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. मॅचमध्ये दुसर्‍यांदा त्याने हेडनची विकेट काढली.कॅटीच आणि पाँटींगनं थोडावेळ खेळून काढला खरा. पण ऑसी कॅप्टनला इशांतच्या बॉलिंगला सामोरं जायला कठीण जात होतं. इशांतच्या जाळ्यात पॉण्टींग अडकला. पॉण्टीगनं 17 रन्स केले. टी झाला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 144 रन्सची आघाडी घेतली होती. कॅटीच आणि हसीची 50 रन्सची पार्टनरशिप हरभजननं संपवली, तर इशांतनी क्लार्कची विकेट काढली आणि भारतानं मॅचमध्ये पुनरागमन केलं. हरभजननं पुन्हा एकदा त्याची जादू दाखवली आणि धोकादायक ठरू पाहणार्‍या हसीला आऊट केलं. दुसर्‍या इनिंगमध्ये भारताचं पारडं जड वाटत होतं. पण त्याचवेळी वॉटसन आणि हॅडिन ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धवून आले. त्यांनी 66 रन्सची आक्रमक पार्टनरशिप केली. आणि टेस्टवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व प्रस्थापित झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close