S M L

आता रेल्वे का खोळंबली याची सर्व माहिती मिळाणार प्रवाशांना

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2016 06:40 PM IST

 आता रेल्वे का खोळंबली याची सर्व माहिती मिळाणार प्रवाशांना

railway train

14 मे : रेल्वे खोळंबली तर ती कशामुळे खोळंबली हे सांगणारे फलक स्टेशनवर लागणार आहेत. तसंच, रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागणार हे सुद्धा प्रवाशांना कळणार आहे. प्रवाशांच्या तक्रारीला तात्काळ उत्तर मिळावं आणि स्टेशन मास्तरांमागची डोकेदुखी कमी करण्यासाठी ही सुविधा करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.

मुंबईतील दादरमध्ये स्टेशन मास्तरांच्या संमेलनात ते बोलत होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या रेल्से स्टेशन्सवर विकासकामं सुरू आहेत, तिथे त्या कामांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

नेहमीच पांढर्‍या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसू शकतील. यासाठी आंतरराष्ट्रीय फँशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं सुरेश प्रभूंनी म्हटलं आहे. तसंच, नव्या ड्रेसकोड सोबतच स्टेशन मास्तरांच्या अधिकारांतही वाढ करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2016 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close