S M L

छेडछाडीचा जाब विचारणार्‍या जवानाची गावासमोर हत्या

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2016 09:32 PM IST

छेडछाडीचा जाब विचारणार्‍या जवानाची गावासमोर हत्या

धुळे - 14 मे :   छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या लष्करी जवानाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यातल्या सय्यदनगरमध्ये घडली आहे. विनोद पवार असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार सरपंच आणि पंचमंडळींच्या समोर घडला. पंजाबच्या पठाणकोटमध्ये लष्करी सेवेत असलेले धुळ्याचे जवान विनोद पवार परीक्षेसाठी आपल्या मूळगावी सैय्यदनगरमध्ये आले होते. गावात पवार आणि राठोड गटात अनेक वर्षांपासून वैर आहे. त्याचवेळी आपल्या बहिणीची छेड काढणार्‍यांना विनोद यांनी जाब विचारलं. याच गोष्टीचा राग मनात ठेवत गावातीलच दुसर्‍या गटातील काही तरुणांनी विनोदला दोन दिवसांपूर्वी मारहाण देखील केली होती. या प्रकरणी विनोदने गावातील जेष्ठ मंडळींकडे तक्रार केल्या नंतर गावकर्‍यांनी पंचाइतीत हा वाद मिटवण्याच ठरवलं होतं. त्यानुसार गावातील सरपंच आणि पंचमंडळाने गावात बैठक बोलवली होती. यावेळी विनोद आणि त्याच्या कुटुंबियांना देखील बैठकीत बोलावण्यात आले होते. बैठकीत दोन गटातील वाद मिटवण्या संधर्भात चर्चा सुरू असतनाच आधीच दाबा धरून बसलेल्या दुसर्‍या गटातील काही तरुणांनी विनोदवर चाकूने वार केले यात विनोद गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.

दरम्यान याघटने नंतर गावात तणावाच वातावरण असून गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच विनोद पवार याचा खून केल्या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2016 09:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close