S M L

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2016 05:37 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

14 मे : रायगडमधील इंदापूरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावर शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला आहे.

भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने समोरुन येत असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील एका प्रवाशाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरुष, 1 महिला आणि 1 चिमुरड्याचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2016 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close