S M L

महसूलमंत्र्यांच्या ऑफिस आणि बंगल्यावर होता गजानन पाटलांचा मुक्त वावर

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2016 08:15 PM IST

Eknath khadase

15 मे :  महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटीलला 30 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. या गजानन पाटीलचा वावर महसूल मंत्री कार्यालय आणि महसूल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता, असं या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. इथे रेट आहेतच असे, कायद्यात बसत नसलं तरी बसवू, बैठक लावतो भाऊंशी, असे उल्लेख तक्रारकर्ता रमेश जाधव यांनी दिलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. ही कॅापी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय आहे. त्यात रमेश जाधव आणि लाचखोर गजानन पाटील यांच्यातला संवाद नोंदवण्यात आला आहे.

महसूल कार्यालयात रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्या झालेल्या भेटी आणि संवाद आता आपण पाहणार आहोत ज्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

तारीख 1 ऑक्टोबर 2015, स्थळ : महसूल मंत्र्यांचं कार्यालय

गजानन पाटील : तुम्हाला 'तशा' पध्दतीनं पैसे जमा करावे लागतील, मग काम होईल.

तारीख 13 ऑक्टोबर 2015

गजानन पाटील : तुमची तयारी आहे ना तशी ? तुम्हाला आठ दिवस देऊ आम्ही , हे कायद्यात बसत नसलं तरी बसवू आम्ही

तारीख 14 ऑक्टोबर 2015 , स्थळ : महसूल मंत्र्यांचं निवासस्थान : रामटेक बंगला

गजानन पाटील : मी काय रोज इथेच असतो, ते सर्व मी करतो, तुम्हाला नाही जमणार

तारीख 15 ऑक्टोबर 2015, स्थळ : महसूल कार्यालय

गजानन पाटील :  तुम्हाला स्पेशल निरोप येईल, बैठकच लावतो ना भाऊंसोबत

दरम्यानच्या काळात भेट झाली नाही , फोनवरून संवाद सुरू होता.

तारीख 5 मे 2016 , स्थळ : महसूल मंत्र्यांचे कार्यालय

रमेश जाधव : गजानन पाटील यांनी एका कागदावर हातानं 30 करोड असं लिहून 30 करोडची मागणी केली.

गजानन पाटील : तिथले भावच तसेत , साहेबांनी तपास केला आहे तसा, तिथं पण ते आपल्याला सांगितलं , त्याच्यात कमी करू आपण, तुम्ही बसल्यानंतर कमी करु आपण...

रमेश जाधव : याचदिवशी गजानन पाटील कक्ष अधिकारी, (महसूल आणि वन) ए. ए. कवळे यांच्याकडे घेऊन गेले, त्यानंतर त्यांच्याकडून आदेशाचा अर्ज मिळाला, त्यात आमच्या संस्थेचा पुर्नविलोकन अर्ज नामंजूर करण्यात आल्याचं समजलं.

गजानन पाटील : पाहिजे का ऑर्डर , किती अलॉट होईल तुम्हाला, आपली चूक झाली ती, आपण ते लगेच करुन टाकायला पाहिजे होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2016 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close