S M L

नीट परीक्षेबाबत राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: May 16, 2016 02:22 PM IST

नीट परीक्षेबाबत राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

16 मे : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने या वषच्पासून बंधनकारक केलेल्या 'नीट' परीक्षेसंदर्भात काही पालकांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवसस्थानी भेट घेतली. यावेळी पालकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

वैद्यकीय प्रवेशासंदर्भात आपण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली असून, त्यांनाही या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. या परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे हा देश नक्की चालवतोय कोण, सरकार की न्यायालये, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं, राज्यात ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याप्रमाणे या विषयावरून उद्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायला नको. देवेंद्र फडणवीस आजच पंतप्रधानांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार आहेत. मोदींनी यामध्ये लक्ष घातलं, तर हा विषय नक्की सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2016 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close