S M L

जाधवांचे र्सव आरोप बिनबुडाचे, अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - खडसे

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2016 10:50 AM IST

Eknath khasse

16 मे :  गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास मी पदाचा राजीनामा देईन, असं म्हणत खडसेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसल्याचा दावा करत तक्रारदार रमेश जाधवविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी सीबीआय चौकशीलाही आपली तयारी असल्याचे खडसे यांनी सांगितले.

डॉ. रमेश जाधव यांनी खडसे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते गजानन पाटील यांनी 30 कोटी रुपये लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर लाच लुचपत विभागाने पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांना गेली अकरा वर्षे ओळखत असून ते माळकरी आहेत असंही त्यांनी सांगितलं.

रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत 5 कोटी आहे. त्यासाठी 30 कोटींची मागणी होईल कशी, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे. मी नाथाभाऊ आहे, इतकी वर्ष राजकारणात आहे, एका फटक्यात मला नालायक ठरवण्याचा अधिकार नाही. जर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांत काहीही तथ्य असेल, तर मी एक मिनिटही पदावर राहणार नाही, असंही खडसे म्हणाले.

दरम्यान, या गजानन पाटीलचा वावर महसूल मंत्री कार्यालय आणि महसूल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता, असं या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. 'इथे रेट आहेतच असे', 'कायद्यात बसत नसलं तरी बसवू', 'बैठक लावतो भाऊंशी', असं उल्लेख तक्रारकर्ता रमेश जाधव यांनी दिलेल्या एफआयआरमध्ये नोंदवलं आहेत. ही कॅापी आयबीएन लोकमतच्या हाती लागली असून त्यात रमेश जाधव आणि लाचखोर गजानन पाटील यांच्यातला संवाद नोंदवण्यात आला आहे.

वादग्रस्त नाथाभाऊ

- खडसेंच्या जवळचा कार्यकर्ता गजानन पाटीलला 30 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी अटक

- चिक्कीचं कंत्राट विशिष्ट ठेकेदारांना देण्यासाठी खडसेंनी लेटर हेड केली होती शिफारस

- खडसेंच्या पुतण्यावर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हे

- विरोधी पक्षनेते असताना तोडपाणीचे पवारांनी केले होते खडसेंवर आरोप

- उद्धव ठाकरेंकडून जाहीर सभेत खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप

- चोवीस तासांत फलोत्पादन विभागाची सबसिडी लाटल्याचा गुलाबराव पाटलांचा आरोप

- जमीन लाटल्याप्रकरणी खडसेंच्या जवळच्या रवी बर्‍हाटेवर अनेक गुन्हे दाखल

- पीआय सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत खडसेंच्या जवळच्या कार्यकर्त्याचं नाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2016 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close