S M L

पनवेल नगरपरिषद आता महापालिका होणार

Sachin Salve | Updated On: May 17, 2016 06:24 PM IST

पनवेल नगरपरिषद आता महापालिका होणार

पनवेल - 17 मे : पनवेल नगरपरिषदेची आता पनवेल महापालिका होणार आहे. सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने यासंदर्भातला अध्यादेश काढलाय. पुढल्या 30 दिवसांमध्ये पनवेलकरांच्या हरकती सुचना मागवण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल नगरपालिकेचे पनवेल महानगरपालिकेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेने आता जोर धरला असून सर्वच प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय नेते अंतिम प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. पनवेल मधील तसेच त्याच्या आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी महानगर पालिका होणे गरजेचे असल्याचे मत पूर्वीपासूनच पनवेलकर व्यक्त करीत होते. आता काही दिवसांतच पनवेलकरांचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासोबतच येणारं नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेल रेल्वेजंक्शन प्रकल्पाच्या दृष्टीने देखील पनवेल महानगरपालिकेचा प्रस्ताव महत्वाचा होता. अखेर राज्य सरकारने महापालिके संदर्भात काढलेल्या अध्यादेशाने पनवेलकारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झालीय. महापालिकेमुळे सिडको पेक्षा जास्त वेगाने विकास होईल अशी अपेक्षा पनवेलकरांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2016 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close