S M L

पक्ष खडसेंच्या पाठीशी पण प्रकरणाचा सरकारशी संबंध नाही - रावसाहेब दानवे

Sachin Salve | Updated On: May 17, 2016 07:40 PM IST

पक्ष खडसेंच्या पाठीशी पण प्रकरणाचा सरकारशी संबंध नाही - रावसाहेब दानवे

मुंबई - 17 मे : लाचखोर गजानन पाटील प्रकरणामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहे. मात्र, खडसेंवर आरोप हे राजकीय हेतूने आहे असं म्हणत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसेंची जोरदार पाठराखण केलीये. परंतु, या प्रकरणाचा सरकारचा संबंध नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलं.

आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा धुराळ उडवणारे एकनाथ खडसे चांगलेच वादात सापडले आहे. त्यांच्यात मतदारसंघातील गजानन पाटील या व्यक्तीने खडसेंच्या नावाने तब्बल 30 कोटींची लाच मागितल्याचं समोर आलंय. या प्रकरणामुळे विरोधकांनी खडसेंवर जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी केली. आज (मंगळवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. खडसेंसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर दानवे यांनी खडसेंची पाठराखण केली. खडसेंवर झालेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. या आधीही आरोप झाले पण विरोधकांच्या आरोपात काही तथ्य आढळलं नाही. भाजप पक्ष पूर्णपणे खडसेंच्या पाठीशी आहे असं दानवे म्हणाले. तसंच या प्रकरणाचा सरकारशी संबंध नाही हे सांगायला दानवे विसरले नाही.

काय आहे प्रकरण ?

गजानन पाटील या व्यक्तीने खडसे यांचा पीए असल्याचं लोकांना भासवत होता. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने 2004 साली 37 एकर जमीन घेतली होती. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीत फाईल जळून खाक झाली. त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव हे अनेकवेळा मंत्रालयाचे खेटे मारत होते. त्यानंतर त्यांची ओळख गणेश पाटील याच्याशी झाली. पाटीलने जाधव यांना काम करण्यसाठी एक फ्लॅट आणि 1 कोटींची मागणी केली. तसंच या चर्चेसाठी खडसेंच्या रामटेकच्या बंगल्यावर बोलावल्याचं समजले. दरम्यान हळूहळू त्यांच्या मागणीत वाढ करत जमीन हस्तांतरित करण्यासाठी 30 कोटींची मागणी केली. त्यामुळे जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून गजानन पाटीलला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2016 07:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close