S M L

गजानन पाटील म्हणतो, 'मी गंमत म्हणून 30 कोटी मागितले होते'

Sachin Salve | Updated On: May 17, 2016 09:00 PM IST

गजानन पाटील म्हणतो, 'मी गंमत म्हणून 30 कोटी मागितले होते'

17 मे : भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेला गजानन पाटील याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे अजब खुलासा केलाय. रमेश जाधव यांना मी गंमत म्हणून 30 कोटी रूपयांची मागणी केली असं पाटील यानं एसीबीला दिलेल्या जबानीत म्हटलं आहे.

गजानन पाटील याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाने रमेश जाधव यांच्याकडून 30 कोटींची मागणी केली होती. रमेश जाधव यांनी गजानन पाटलांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. जाधव यांच्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून अटक केली. पाटील सध्या एसीबीच्या ताब्यात आहे. चौकशीदरम्यान पाटील सहकार्य करत नसल्याचा आरोप एसीबीनं केला होता. पण न्यायालयानं पोलीस कोठडी न देता गजानन पाटील याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. उद्या पाटील यांच्या वतीनं जामीनासाठी अर्ज करण्यात येणार आहे अशी माहिती पाटील यांचे वकील शाम केसवानी यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2016 09:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close