S M L

'ती' गाडी भंगारात गेली, दमानियांना हवी असेल तर दान देऊ -एकनाथ खडसे

Sachin Salve | Updated On: May 18, 2016 09:16 AM IST

'ती' गाडी भंगारात गेली, दमानियांना हवी असेल तर दान देऊ -एकनाथ खडसे

18 मे : दमानिया यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, त्यांनी सुपारी घेऊन आरोप केलाय असा प्रत्यारोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. तसंच ती गाडी भंगारात गेली असून हवी असले दमानियांना दान करू असा टोलाही खडसेंनी लगावला.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांची लिमोझिन गाडी अवैध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. मुद्दा असा आहे की तुलनेनं छोट्या असलेल्या गाडीचा विस्तार केला गेला, पण हे करताना आरटीओची परवानगी घेतली नाही, असा आरोप दमानियांनी केला आहे. त्यांच्या या गाडीवर सरकार कारवाई करणार का, असा सवाल दमानियांनी केलाय. दमानिया यांच्या आरोपांना एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना उत्तर दिलं. दमानिया यांनी आरोप केलेली गाडी भंगारात आहे, आणि ती लिमोझिन नाही तर सोनाटा आहे, असं खडसेंनी सांगितलं. दमानियांना हवी असेल तर ही गाडी आपण त्यांना दान देऊ, असा टोलाही खडसेंनी लगावला. तसंच नाही तर दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा खडसे यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2016 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close