S M L

खडसेंच्या वादावर दिल्ली दरबारी चर्चा ?

Sachin Salve | Updated On: May 18, 2016 11:39 AM IST

खडसेंच्या वादावर दिल्ली दरबारी चर्चा ?

18 मे : गजानन पाटील लाच प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची दिल्लीश्वरांनी दखल घेतलीये. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान खडसेंबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय.

नीट परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहे. पण, या भेटीत आता एकनाथ खडसे यांच्या वादाची माहिती ही मोदींना दिली जाणार आहे. खडसेंचा कथित पी.ए गजानन पाटील प्रकरणाची दखल भाजपच्या दिल्ली नेतृत्त्वाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. आजच्या भेटीचा हाच मुख्य अजेंडा असल्याचं समजतंय.

काल मंगळवारीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात जाऊन भेटले आणि लगेच रावसाहेब दानवे यांनी खडसे यांना भाजप प्रदेश कार्यालयात बोलून घेतले आणि याबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीनंतर पक्ष खडसेंच्या पाठीशी आहे पण गजानन पाटील लाचप्रकरणाचा सरकारशी संबंध नाही असं दानवेंनी स्पष्ट केलं होतं. आता दिल्ली दरबारी खडसेंबाबत मोदी काय निर्णय घेता हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2016 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close