S M L

विदर्भ तापला, ऑरेंज अलर्ट जारी

Sachin Salve | Updated On: May 18, 2016 01:27 PM IST

summer-heatनागपूर - 18 मे : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून प्रादेशिक हवामान खात्याने आता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर, खामगाव या विदर्भातील शहरांध्ये सर्वाधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मंगळवारी मोसमातील सर्वात जास्त 46.5 अंश सेल्सिअस एवढं तापमान अकोल्यात नोंदवलं गेलंय. एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील तापमान 43 डिग्री सेल्सियसच्या खाली जातच नाहीये. अकोल्यापाठोपाठ वर्धा 46 तर नागपूर शहरात 45.9 एवढे तापमान नोंदवले गेले. मंगळवारी वर्ध्याचा पारा 46 अंशावर पोहोचला. त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहेत. उकाडा वाढल्याने कुलरही निकामी ठरले आहेत. एकंदरित पाहता मे महिन्याचे पंधरा दिवस कसे राहणार या विचारात पडले आहेत.

काय आहे ऑरेंज अलर्ट ?

अचानक उष्णता वाढण्याची शक्यता असतांना जारी केला ऑरेंज अलर्ट

या दरम्यान तापमान 43.1 ते 46.8 डीग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता

या काळात सहा ते सात लिटर पाणी पिण्याचा सल्ला

सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2016 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close