S M L

हवालदिल शेतकरी उतरला रस्त्यावर, नाफेडच्या केंद्राला टाळं ठोकण्याचा प्रयत्न

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2016 08:47 PM IST

 हवालदिल शेतकरी उतरला रस्त्यावर, नाफेडच्या केंद्राला टाळं ठोकण्याचा प्रयत्न

प्रशांत बाग, नाशिक , 18 मे : दुष्काळानं होरपळलेल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात आता कांद्यानं पाणी आणलं आहे. कांद्याच्या दरात झालेल्या जोरदार घसरणीचा थेट फटका हा शेतकर्‍यांना बसला आहे. नाफेडनं खरेदि जरी सुरू केली असली तरी भावात कोणताच दिलासा न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी थेट नाफेडच्याच केंद्रावर हल्लाबोल केला. शेतकरी संघटनेनं या आंदोलनातील आक्रमक रुप पाहून थेट दिल्लीहून दाखल झालेल्या अधिकार्‍यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे. दरम्यान नाफेड केंद्रावरील आजची खरेदी शेतकरी संघटनेनं बंद पाडली आहे.a

एकीकडे अवकाळीचा फटका तर दुसरीकडे कांदा निर्यातीच्या धोरणात सतत होणारे बदल यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. कांदा 3 रुपये किलो इतक्या नीचांकी दरानं विकला गेला. अखेर हवालदिल झालेल्या शेतकरी रस्त्यावर उतरला. शेतकरी संघटनेनं पिंपळगावमधल्या नाफेडच्या प्रमुख केंद्राला कुलुप ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संतापलेल्या शेतकरी महिलाही रस्त्यावर उतरल्या त्यांनी चक्क जिल्हाधिकार्‍यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली.

नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या परिस्थितीची आणि नाफेड खरेदी केंद्राची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या नाफेडच्या जनरल मॅनेजर ए के रथ यांनाही शेतकर्‍यांच्या या संतापाचा सामना करावा लागला. केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करून 2 हजार रुपये हमीभाव मागणीवर निर्णयाची तयारी रथ यांनी दाखवली.

कांदा उत्पादक शेतकरी हा व्यापार्‍यांच्या हातचं बाहुलं बनला आहे. एरव्ही चढ्या भावानं ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आज भाव पडल्यानं शेतकर्‍यांना रडवतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2016 08:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close