S M L

आसाममध्ये पहिल्यांदाच उमलले 'कमळ', काँग्रेसचा उडाला धुव्वा

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 11:37 AM IST

bjp_news34आसाम - 19 मे : मोदी लाटेवर स्वार होत भाजपने दिल्ली गाठली. पण, उत्तरप्रदेश निवडणुकीत पराभवानंतर मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरू झाली. पण, आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून पहिल्यांदाच आसाममध्ये कमळ उमलले आहे. काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने दणदणीत 77 जागांवर आघाडी मिळवली असून 4 जागांवर विजय मिळवला आहे.

आसाम विधानसभेच्या आखाड्यात सत्तांतर झालंय. आतापर्यंत सत्तेचं फळ चाखणार्‍या काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. मागील निवडणुकीत काँग्रेसने 78 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली होती. पण, यावेळी मोदी लाट कायम दिसत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत 77 जागांवर आघाडी घेतलीये. मागील निवडणुकीत भाजपला फक्त 5 जागेवर समाधान मानावे लागले होते. यंदा मतदारराजाने काँग्रेसला चांगलाच हात दाखवत सत्तेवरून खाली खेचले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आसाममध्ये भाजप आपलं सरकार स्थापन करणार आहे. भाजपचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. आसाममधला विजय हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून हा विजय कार्यकर्त्यांचा आहे अशी प्रतिक्रिया राम माधव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close