S M L

आतातरी प्रादेशिक पक्षांचं महत्व ओळखा, सेनेचा भाजपचा चिमटा

Sachin Salve | Updated On: May 20, 2016 01:00 PM IST

आतातरी प्रादेशिक पक्षांचं महत्व ओळखा, सेनेचा भाजपचा चिमटा

20 मे : पाच राज्यांचा निकालात भाजपच्या यशावर शिवसेनेनं चांगलंच तोंडसुख घेतलंय. प. बंगालात ममतांचा आणि केरळात डाव्यांचा पराभव भाजप करू शकला नाही. पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे असा चिमटा शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'मधून काढलाय.

पाच राज्यांचा निकाल स्पष्ट झालाय. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रादेशिक पक्षांनी घवघवीत यश मिळवलंय. हाच धागा पकडून शिवसेनेनं भाजपला चार शब्द सुनावण्याची संधी वाया जाऊ दिली नाही. या निकालावरून 'सामना;मध्ये पुन्हा एकदा मोदींवर टीका करण्यात आली आहे. पाच राज्यांचे निकाल अनपेक्षित किंवा धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे, पण तामिळनाडूत जयललितांचा, प. बंगालात ममतांचा आणि केरळात डाव्यांचा पराभव भाजप करू शकला नाही. पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे असा चिमटा सेनेनं काढलाय.

तसंच आसाम व केरळात काँग्रेसची सत्ता होती. ही राज्ये काँग्रेसने गमावली आहेत. काँग्रेसचा धुव्वा उडाला असे विश्लेषण होत आहे. मग आसाम वगळता इतर चार राज्यांत भाजपच्या बाबतीत काय झाले? असा सवालही उपस्थिती केलाय.

प. बंगालात आता रवींद्र संगीताचे सूर ऐकू येत नाहीत, तर बॉम्बचे आवाज ऐकू येतात, असे अमित शहांचे म्हणणे होते; पण बंगाली जनतेने शेवटी विजयाचा रसगुल्ला ममतादीदींनाच भरवला. प. बंगालात भाजपने खाते उघडले यावरच समाधान मानायचे होते तर त्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व संपूर्ण भाजप सरकारने प्रतिष्ठा पणास लावायची कारण नव्हते असा टोलाही लगावण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2016 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close