S M L

महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली, कॉन्स्टेबल रफीक शेख यांनी केलं एव्हरेस्ट सर

Sachin Salve | Updated On: May 20, 2016 10:40 AM IST

महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली, कॉन्स्टेबल रफीक शेख यांनी केलं एव्हरेस्ट सर

औरंगाबाद - 20 मे : दुर्दम इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पोलीस कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी एव्हरेस्ट सर केल्याचा पराक्रम गाजवलाय. अनेक अडथळे पार करून रफिक शेख यांनी तिसर्‍या प्रयत्नात एव्हरेस्ट गाठलाच. त्यांच्या या पराक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलंय.

औरंगाबाद ग्रामीण पोलीसमध्ये कॉन्सटेबल पदावर काम कऱणार्‍या एका जवानानं जगातला सर्वात उंच असा एव्हरेस्ट सर केलाय. अत्यंत सामान्य कुटुंबातील रफीक शेख यांनी ही कामगिरी केलीये. गुरुवारी सकाळी अकरा वाजता तो आणि त्याची टीम एव्हरेस्ट पोहचल्याची माहिती औरंगाबाद पोलीस दलाचे अधीक्षक नविनचंद्र रेड्डी यांच्याकडे पोहचली.

रफिक शेख हे ड्युटी करून औरंगाबाद परिसरातील डोंगर चढायचा सराव करीत असे. पाठीवर 20 किलो वजन घेऊन दौलताबादचा किल्ला ते चढत आणि उतरत असे, तब्बल चार वर्ष त्यांनी हा सराव केला. यात त्यांनी एका दिवसांचा सुद्धा खंड पडू दिला नाही.

या आधी त्यानी दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एकदा हवामान खराब झाल्यानं आणि नेपाळमध्ये भूकंप झाल्यामुळं  त्यांना मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. अखेर तिसर्‍या प्रयत्नात त्यांनी एव्हरेस्ट सर करून दाखवलाच. औरंगाबादमध्ये परतल्यानंतर त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर शेख यांचे फोटो पोस्ट करून कौतुक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2016 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close