S M L

अखेर निलेश राणे पोलिसांना शरण

Sachin Salve | Updated On: May 20, 2016 09:45 PM IST

अखेर निलेश राणे पोलिसांना शरण

चिपळूण - 20 मे : संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज (शुक्रवारी) सकाळी 10 वाजता चिपळूण पोलिसांना शरण आले. शरण आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केलीये. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय. दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत मेळाव्याला हजर राहिले नाही म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मारहाण केली. या प्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण अटकपूर्व जामिनीसाठी राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, निलेश राणे यांनी स्वतःहून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. कोर्टाने त्यांना पोलिसांना शरण येणाचे आदेश दिले. त्यानंतर आज निलेश राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पोलिसांना शरण आले. पोलिसांनी राणे यांना अटक केलीये. सध्या चिपळूणमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये सध्या कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2016 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close