S M L

निलेश राणेंची तब्येत बिघडली, कोठडी ऐवजी रुग्णालयात 'रवानगी'

Sachin Salve | Updated On: May 21, 2016 01:36 PM IST

निलेश राणेंची तब्येत बिघडली, कोठडी ऐवजी रुग्णालयात 'रवानगी'

चिपळूण- 21 मे : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंचा कोठडीवरून नवा वाद निर्माण झालाय. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोठडी ऐवजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एवढंच नाहीतर निलेश राणे शरण येण्याच्या आधीच तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बदलीही करण्यात आली होती.

संदीप सावंत मारहाण प्रकरणी निलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पण चिपळूण पोलीस स्टेशनहून कोठडीत जायच्या आधीच गाडीतच त्यांच्या पोटात दुखायला लागलं. मग त्यांची रवानगी जेलमध्ये करण्याऐवजी थेट रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करण्यावाचून पर्यायच नव्हता. कारण दोन दिवसांच्या सुटीमुळे जामिनासाठी अर्ज थेट सोमवारी करता येणार आहे.

त्यामुळे दोन दिवस जेलमध्ये राहण्याऐवजी रुग्णालयातच राहिलेलं बरं असा विचार निलेश राणेंनी केला असेल. त्यातच निलेश राणे शरण येण्यापूर्वी दोनच दिवस आधी या प्रकरणाचे तपास अधिकारीही बदलण्यात आले.

याप्रकरणाचा तपास आधी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर आणि आता पोलीस उपअधीक्षक महादेव गावडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. त्यामुळे तर राणेंच्या राजकीय दबावाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

IBN लोकमतचे सवाल

1: संदीप सावंत मारहाण प्रकरणातील तपास अधिकारी तडकाफडकी का बदलले गेले?

2: निलेश राणे पोलिसांना शरण आल्यावर नव्या तपास अधिकार्‍यांनी त्यांना तातडीने कोर्टात हजर करण्याची घाई का केली ?

3:संदीप सावंत मारहाण प्रकरणात निलेश राणेंप्रमाणेच गुन्हे दाखल असलेल्या इतर चार सहआरोपीना पोलीस कोठडी मिळते मग निलेश राणेंना का नाही ?

4 : न्यायालयातला सरकारी पक्षाचा युक्तीवाद जाणीवपूर्वक सौम्य ठेवण्यात आला का ?

5; निलेश राणेंची तब्येत अशी अचानक कशी बदलली की त्याना कारागृहात न नेता थेट रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात न्यावं लागलं ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2016 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close