S M L

खडसेंना दाऊद इब्राहिमचा फोन, 'आप'चा आरोप

Sachin Salve | Updated On: May 21, 2016 05:45 PM IST

खडसेंना दाऊद इब्राहिमचा फोन, 'आप'चा आरोप

21 मे : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या फोनवर मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमच्या नंबरवरून फोन आल्याचा गंभीर आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केलाय. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियामधून त्यांनी यावर चर्चा सुरू केली होती.

गजानन पाटील आणि जावयाची लिमोझिन कार प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आज आणखी एक गंभीर झालाय. दाऊद इब्राहिमच्या पत्नीचा मोबाईल कॉल रेकॉर्ड हॅक करण्यात आले होते. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे फोन नंबर आढळून आले. यामध्ये एकनाथ खडसे यांचाही नंबर आढळून आला. पण ज्या फोनवर आंतरराष्ट्रीय कॉल आला होता, तो फोन वर्षभरापूर्वीच बंद केला होता असं खडसे यांनी म्हटलंय.

मात्र, हॅकरकडून याबाबतचा तपास करण्यात आला, त्यावेळी त्यामध्ये एकनाथ खडसे यांचा नंबर वारंवार कॉल लॉगमध्ये दिसत असल्याचा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते, असंही प्रीती यांचं म्हणणं आहे.

तर एकनाथ खडसे म्हणतात, हा माझा नंबर बंद आहे. पण आयडिया मोबाईल चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई सीपीला हा तपास करण्यास सांगितलंय. तरीही जळगावचे पोलीस अधिकारी सुपेकरांनी आयडिया कंपनीकडून कॉल लॉग मागवला आहे.

दरम्यान, प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेण्याआधीच एकनाथ खडसे यांनी प्रेस नोट काढून त्यांच्या आरोपांचं खंडन केलंय. ज्या फोन वर आंतरराष्ट्रीय कॉल आला होता, तो फोन वर्षभरापूर्वीच बंद केला होता असं खडसे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2016 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close