S M L

दाऊदला कॉल नाहीच; पोलिसांचा खडसेंना दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: May 22, 2016 08:25 PM IST

दाऊदला कॉल नाहीच; पोलिसांचा खडसेंना दिलासा

22 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी वारंवार संपर्क असल्याच्या आरोपातून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पोलिसांनी दिलासा दिला आहे. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांनी एकनाथ खडसे यांच्या मोबाइलवर दाऊद इब्राहिमच्या मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.

त्यानंतर खडसे यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड्स तपासले गेले असून प्राथमिक तपासणीनुसार सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत दाऊद इब्राहिमच्या कोणत्याही क्रमांकावरून खडसे यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा खडसे यांनी अशा कोणत्याही क्रमांकावर संपर्क केला नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

प्रीती मेनन यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर दाऊदशी संभाषण झाल्याचा आरोप केला होता. मात्र मुंबई क्राईम ब्रँचचे सह आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी चौकशी केली असता मेनन यांनी उल्लेख केलेल्या फोनवरुन दाऊदच्या कथित क्रमांकावर फोन झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2016 08:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close