S M L

उत्तन डंपिंग ग्राऊंडची आग अजूनही धुमसतेय, परिसरात धुराचं साम्राज्य

Sachin Salve | Updated On: May 23, 2016 04:45 PM IST

उत्तन डंपिंग ग्राऊंडची आग अजूनही धुमसतेय, परिसरात धुराचं साम्राज्य

मुंबई -23 मे : देवनार नंतर आता भाईंदर, उत्तन इथल्या डंपिंग ग्राऊंडने पेट घेतलाय. गेल्या दोन दिवसांपासून डंपिंग ग्राऊंडवर लागलेली आग अजुनही धुमसतेय. परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालंय. धुरांच्या लोटांमुळं परिसरातल्या नागरिकांना त्रास होतोय.

शनिवार रात्रीपासून ही आग धुमसत होती, रविवारी दुपारी कडक उन्हामुळे डंपिंग ग्राउंडच्या आगीने पेट घेतला. नंतर तिनं रौद्ररुप धारण केलंय. आग विझवण्यासाठीची यंत्रणा अपुरी आहे. फायर ब्रिगेडचा फक्त एक बंब घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहे .मीरा भाईंदर महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे ही आग धुमसतंय. असा आरोप स्थानिकांनी केलाय.

दुसरीकडे या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प राबवणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सागंण्यात येतंय. पण गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंद पडलाय. आणि प्रकल्पाच्या बाजूला कचर्‍याचे मोठ मोठाले डोंगर उभे राहिलेत. याचा स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2016 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close