S M L

एमईटी ट्रस्टवरून पंकज आणि समीर भुजबळांना हटवा, धर्मादाय आयुक्तांचे आदेश

Sachin Salve | Updated On: May 23, 2016 06:30 PM IST

एमईटी ट्रस्टवरून पंकज आणि समीर भुजबळांना हटवा, धर्मादाय आयुक्तांचे आदेश

23 मे : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसलाय. एमईटीच्या ट्रस्टवरून पंकज भुजबळ यांना खजिनदार पदावरुन आणि समीर भुजबळ यांना सचिव पदावरुन दूर करावे असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियामागे चौकशीचा ससेमिरा संपायचा नाव घेत नाहीये. अशातच मुंबईतील एमईटी कॉलेज प्रकरणी संस्थेचे संस्थापक सदस्या सुनिल कर्वे यांच्या चार वर्षांच्या लढ्याला आज यश आलंय.

मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनीकोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार फेब्रुवारी 2012 मध्ये ईओडब्ल्यू (EOW) कडे दिली होती. गेले चार वर्ष याबाबत कायदेशीर लढा सुरू होता. अखेरीस या बाबत सुनिल कर्वे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी मार्च महिन्यात पंकज भुजबळ यांची मुंबई धर्मदाय आयुक्तालयात चौकशी केली होती. या प्रकरणी आता एमईटीच्या ट्रस्टवरुन पंकज भुजबळ यांना खजिनदार पदावरुन आणि समीर भुजबळ यांना सचिव पदावरुन हटवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2016 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close