S M L

निलेश राणेंना अखेर सशर्त जामीन मंजूर

Sachin Salve | Updated On: May 23, 2016 08:51 PM IST

nilesh_raneचिपळूण - 23 मे : काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर झाला आहे. निलेश राणे यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि चिपळूण शहर प्रवेश करण्यास 1 महिना बंंदी, तसंच स्थानिक पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या सशर्त अटींवर निलेश राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या मेळाव्याला हजर राहिला नाही म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या साथीदारांनी संदीप सावंत यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीये. मात्र अटक टाळण्यासाठी निलेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर निलेश राणे यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांना शरण येणं भाग होतं. अखेरीस मागील आठवड्यात शुक्रवारी निलेश राणे चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तब्येत बिघडल्यामुळे निलेश राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची कोठडीत रवानगी टळली. आज पुन्हा एकदा कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी झाली असता कोर्टाने निलेश राणेंना दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2016 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close