S M L

नागपूर की 'गुंडापूर' !, छेडछाडीमुळे एकीची आत्महत्या, तर एका मुलीची मृत्यूशी झुंज सुरू

Sachin Salve | Updated On: May 24, 2016 01:46 PM IST

vadala_rape_caseनागपूर - 24 मे : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जिल्ह्यात काय चाललं असा सवाल आता उपस्थिती झालाय. गुंडाच्या छेडछाडीमुळे एका शाळकरी मुलीने आत्महत्या केलीय तर आणखी एका घटनेत अतिप्रसंगाला विरोध करणार्‍या मुलीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

नागपूरमधील कामठी इथल्या एका शाळकरी मुलीने गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. दहावी इयत्तेत शिकणार्‍या मुलीने आत्महत्या केल्यानंतर सुरुवातीला कारण कळालं नाही. मात्र, शाळेतील मैत्रीणींकडून माहिती समोर आली. या प्रकरणी कामठी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

दुसर्‍या घटनेत रामटेक तालुक्यातील कांद्री इथे महेश रौतेल या 45 वर्षीय व्यक्तीने 14 वर्षीय मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करणार्‍या मुलीवर या गुंडाने कोयत्याने तिच्या गळ्यावर, चेहर्‍यावर आणि हातावर वार केले. यात या मुलीच्या उजव्या हाताची दोन बोटं कापली गेली. या मुलीवर नागपुरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2016 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close