S M L

उजनी धरणाने गाठला तळ, मृतसाठ्यात फक्त 50 टक्के पाणी शिल्लक

Sachin Salve | Updated On: May 24, 2016 04:59 PM IST

उजनी धरणाने गाठला तळ, मृतसाठ्यात फक्त 50 टक्के पाणी शिल्लक

24 मे : इंदापूरजवळच्या उजनी धरणातली पाणी पातळी वजा 50 टक्के एवढीच उरली आहे. याचा अर्थ, मृतसाठ्यात फक्त 50 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे.

उजनीच्या पाण्याची पातऴी रोजच्या रोज जसजशी घटत चालली आहे, तसतसा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आसलेला शेतकरी हवालदील झाला आहे. उजनीचे पाण्यावर पुणे,सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टर एकर शेती अवलंबून आहे. उजणीचे पाणी जसजसे पात्र सोडून खाली आत आहे, तसेतसे शेतकरी पाण्याच्या पाठी मागे धावतायत. लाखो रूपये खर्च करून पोकलेंडच्या साह्याने पात्रात चर खांदून पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी बँकांची लाखो रुपये कर्ज घेऊन शेतीसाठी पाईपलाईनी केल्या आहेत. मात्र, आता हेच पाणी आटल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं जळून जात आहेत. दुसरीकडे बँकाची कर्ज कशी फेडायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2016 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close