S M L

दुष्काळीभागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका, कोर्टाचे आदेश

Sachin Salve | Updated On: May 24, 2016 09:17 PM IST

दुष्काळीभागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका, कोर्टाचे आदेश

24 मे : दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. धरण आणि विहिरीतलं पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात यावे अशी सुचनाही कोर्टाने केलीये.

संपूर्ण मराठवाड्यासह राज्यात तीव्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतंय. या पार्श्वभूमीवर आज मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी दरम्यान दुष्काळीभागात बांधकामांसाठी पाणी देऊ नये असे आदेश दिले. तसंच धरण आणि विहिरीतलं पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात यावेत. हा निर्णय केवळ दुष्काळी भागासाठी लागू असणार आहे. याआधीही हायकोर्टाने पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यास नकार दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2016 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close