S M L

मॉस्कोत स्फोट, 50 ठार

29 मार्चरशियाच्या मॉस्को शहरामध्ये मेट्रो स्टेशनवर दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत 50 जणांचा बळी गेला आहे. सेंट्रल मॉस्कोमधील दोन महत्त्वाच्या मेट्रो स्टेशन्समध्ये हे स्फोट झाले आहेत.पहिला स्फोट मॉस्कोतील लुबँका स्टेशनमध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. तर दुसरा स्फोट पार्क कुलटरी स्टेशनमध्ये झाला. यावेळी मेट्रो ट्रेन या स्टेशनमध्ये शिरत होती. यातील लुबँका स्टेशन अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या स्टेशनच्या वरच रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे ऑफिस आहे. सोबतच हे स्टेशन जपानमधील टोकियोनंतर जगभरातील दुसर्‍या क्रमांकांचे सगळ्यात जास्त वर्दळ असलेले स्टेशन आहे. यातील लुबँका स्टेशनमधील पहिला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर हा दहशतवादी हल्ला असल्याचे रशियन सरकारनेही म्हटले आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे. एक नजर टाकूयात ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांवर... मार्च 1995 - टोकियोमध्ये झालेल्या ट्रेन ब्लास्टमध्ये 13 जण मृत्यूमुखी. तर 50 जण गंभीर जखमी 1995 - फ्रान्समध्येही दहशतवाद्यांनी पॅसेंजर ट्रेनमध्ये घडवलेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू, तर 100जण गंभीर जखमी 11 मार्च 2004 - इटलीतील मॅद्रीद शहरात ट्रेनमध्ये 10 सीरियल ब्लास्ट. यात 190 जणांना प्राण गमवावे लागले. तर 2 हजार जण गंभीर जखमी जुलै 2005 - लंडनमध्ये 3 अंडरग्राऊंड स्टेशन्स आणि डबल डेकरबसमध्ये स्फोट. 52 जणांचा मृत्यू , 700 जण जखमी जुलै 2006 - मुंबईत लोकलमध्ये झालेल्या सीरियल ब्लास्टमध्ये 200 जणांना प्राण गमवावे लागले. तर 900 जण गंभीर जखमी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2010 07:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2010 07:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close