S M L

डोंबिवली स्फोटात मृतांची संख्या 11 वर

Samruddha Bhambure | Updated On: May 27, 2016 07:09 PM IST

डोंबिवली स्फोटात मृतांची संख्या 11 वर

27 मे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत काल (गुरूवारी) झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या आता 11 वर पोहचली आहे.  अजून 14 गंभीर जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. आतापर्यंत 126 जणांवर उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. आणखी 42 जखमीवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, परवानगी नसतानाही मोकळ्या जागेत रिऍक्टर ठेवल्याने कंपनीच्या मालकांविरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 डोंबिवलीत एमआयडीसीमध्ये काल झालेल्या स्फोटानंतर आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली आहे. तसंच महापालिकेने आता स्वच्छतेचं कामही सुरू केलं आहे. स्फोटामुळे झालेल्या घरांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचे काम अद्याप सुरुच आहे. मध्यरात्रीपर्यंत 526 घरांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहेत. तर एनडीआरएफच्या जवानांकडून अजूनही ढिगारा उपसण्याचे काम सुरूच असून मदतकार्यासाठी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2016 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close