S M L

डोंबिवली स्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 08:40 PM IST

डोंबिवली स्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

 डोंबिवली - 27 मे : डोंबिवली स्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे अशी घोषणा औद्योगिक सुरक्षामंत्री प्रकाश मेहता यांनी केलीये. ठाण्याचे जिल्हाधिकारी समितीचे प्रमुख असणार आहे. वरिष्ठ अधिकारी आणि रसायन क्षेत्रातले तज्ञ आणि पोलीस अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश असणार आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल देणार आहे. नेमकी घटना का घडली आणि अशा घटना घडू नयेत यासाठी समिती उपाययोजना सुचवणार आहे.

दरम्यान, डोंबिवलीमध्येप्रोबेस केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 11वर पोहोचला आहे. तर 42 जण जखमी आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. 126 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलाय. दुसरीकडे, या स्फोटाला प्रोबेस कंपनीच्या मालकाला जबाबदार धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कालच्या भीषण स्फोटानंतर आज दिवसभर ढिगारा उपसण्याचं आणि सफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं. उद्याही हे काम सुरू असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2016 10:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close