S M L

डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा 13 वर

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 01:40 PM IST

डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा 13 वर

डोंबिवली - 28 मे : डोंबिवलीमध्ये प्रोबेस केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 13 वर पोहोचलाय. तर 42 जण जखमी आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. ज्यांचं नुकसान झालं अशा 1092 जणांचे कालपासून पंचनामे करण्यात आले आहेत.

तसंच डोंबिवली स्फोटाच्या चौकशीसाठी समिती नेमली गेली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी समितीचे प्रमुख आहेत. दरम्यान, ढिगार्‍याखालून थायलिन क्लोराईडचे तीन ड्रम सापडले आहेत. प्रत्येक ड्रमची क्षमता 300 किलो एवढी आहे. आज दुसर्‍या दिवशीही रेस्क्यु ऑपरेशन सुरू असणार आहे. गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास प्रोबेस कंपनी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2016 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close