S M L

नागपूरमध्ये मंदिरावर दरोडा, पुजार्‍याची हत्या

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 03:00 PM IST

नागपूरमध्ये मंदिरावर दरोडा, पुजार्‍याची हत्या

नागपूर -28 मे : नागपूरच्या वाडीमधील दरोडेखोरांनी एका मंदिरावर दरोडा टाकून पुजार्‍याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत पुजार्‍याचा मुलगा गंभीर जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

डिफेन्स क्वार्टर परिसरातील कलका माता मंदिरात या मंदिरातील पुजारी जगन कोडापे वय 55 वर्ष आणि त्याचा मुलगा राकेश जगन कोडापे वय वर्ष 22 या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. या घटनेत जगन कोडापे याचा जागीच मृत्यू झाला असून राकेश गंभीर जखमी झाले असता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. वाडी पोलीस आणि नागपूर गुन्हे शाखा या प्रकरणी आरोपींचा शोध घेत असून या खूना मागचे नेमके कारण काय हे ही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रथम दर्शनी मंदिरातील दानपेट्या लुटण्यासाठी दरोडेखोरांनी हा हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2016 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close