S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अद्यायावत अॅम्ब्युलन्स सज्ज -गडकरी

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 03:32 PM IST

044513nitin_gadkariनागपूर - 28 मे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर सतत होणार्‍या अपघातांबद्दल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केलीये. एक्स्प्रेस वेवर अद्यायापत अशा अॅम्ब्युलन्स सज्ज करण्यात आल्या आहेत अशी माहिती गडकरींनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.

मुंबई पुणे एक्स्प्रेक्स वेवर चार अद्यायावत अॅम्ब्युलन्सेस सज्ज करण्यात आल्या आहेत. एका वेळेस चार रुग्णांना या अॅम्बुलन्समधून नेता येऊ शकेल अशी व्यवस्था या गाड्यांमध्ये करण्यात आलीये. तसंच या गाड्यांना मर्सिडिज या कंपनीचे इंजिन लावण्यात आले आहेत. अपघातात सापडलेले दुर्घटनाग्रस्त वाहनांचे लोखंडी, लाकडी भाग सहज कापता येतील. जेणे करून जखमींना ताबडतोब बाहेर काढता येईल अशा या ऍम्ब्युलन्स असणार आहे अशी माहितीही गडकरी यांनी दिलीये. देशभरात अशा एक हजार ऍम्ब्युलन्स आणणार असल्याचंही गडकरी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2016 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close