S M L

नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्यात शाब्दिक चकमक

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 04:04 PM IST

नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्यात शाब्दिक चकमक

28 मे : जी व्यक्ती कधीही काश्मीरमध्ये राहिली नाही, त्या व्यक्तीनं काश्मिरी पंडितांसाठी लढा सुरू केलाय. अचानक ते निर्वासित झाले, असं म्हणतायेत, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी अनुपम खेर यांच्यावर सडकून टीका केलीय. नवी दिल्लीत त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ते बोलत होते. अनुपम खेर गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवतायेत. त्यावरुन शहा आणि खेर यांच्या शाब्दिक चकमक उडालीये.

नसिरुद्दीन शहा यांच्या टीकेला अनुपम खेर यांनी लगेच उत्तर दिलं. "हे खूप विचित्र आहे. माझा जन्म सिमल्यात झाला याचा अर्थ असा नाही की मी काश्मिरी किंवा पंजाबी लोकांबद्दल बोलू शकत नाही." असा पलटवार खेर यांनी केला.

यावादात दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनीही उडी घेतली असून त्यांनी अनुपम खेर यांना पाठिंबा दर्शवलाय. काश्मिरी पंडितांच्या हक्कांसाठी लढायला काश्मिरी असण्याची गरज नाही. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रत्येक भारतीयानं निषेध करावा, आणि त्यांच्या पुनर्वसानाच्या मागणीला पाठिंबा द्यावा अशी भूमिका भांडारकर यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2016 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close