S M L

विधानपरिषदेसाठी राणे मैदानात; राष्ट्रवादीकडून मुंडे,निबांळकरांना उमेदवारी

Sachin Salve | Updated On: May 28, 2016 09:40 PM IST

rane on vidhan parishadमुंबई - 28 मे : सत्तेपासून दुरावलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मित्रपक्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र मैदानात उतरणार आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसला 1 जागा लढवणार असल्याचा निर्णय आज झालाय. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निबंळकर, तर काँग्रेसकडून नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत.

नारायण राणेंनी कुडाळमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबईत बांद्रामधून ते पुन्हा शिवसेनेकडून पोटनिवडणुकीत हरले होते. त्यामुळे आता परिषदेत जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाहीये. नारायण राणेंचे राज्य काँग्रेसमध्येच अनेक विरोधक असले, तरी ते सभागृहात आले तर सरकारवर टीकेची झोड उठवतील, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. ते जर परिषदेत आले, तर काँग्रेसमधल्या अंतर्गत समिकरणात मोठे बदल होऊ शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने नारायण राणे यांनी आता पुन्हा एकदा कमबॅक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2016 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close